सामाजिकराज्य

अखिल भारतीय मराठा सेवा संघ आरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष पदी पी एम पाटील सर

कोल्हापूर – मराठा समाजासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील ४२ संघटनांची मराठा आरक्षण व मराठा समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळण्यासंदर्भात कोल्हापूरातील सर्किट हाऊस येथे महाराष्ट्र राज्य परिषद २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मनोज जरांगे पाटील वगळता राज्यातील ४२ संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या होत्या. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करून लढत राहण्यापेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन शासनाशी चर्चा करून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात व मराठा समाजाला न्याय मिळावा अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.

 याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पी एम पाटील सर यांची अखिल भारतीय मराठा सेवा संघ आरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष विजय राजे महाडिक, सांगली यांच्या हस्ते पाटिल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी नितीन डांगे पाटील, प्रशांत पवार, जगदीश जाधव, रावसाहेब पाटील, दीपिका पाटील, रेखाताई पाटील, पुष्पाताई पाटील, रंजनाबाई पाटील यांच्यासह उपस्थित महाराष्ट्रातील समाज बांधवांनी पी एम पाटील सर यांचे अभिनंदन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button