जळगावसामाजिक

अर्धमसला मस्जिद ब्लास्ट आरोपींवर मकोका, यूएपीए किंवा एनएसए अंतर्गत कारवाई करा

एकता संघटनेची मागणी

जळगाव – बीड जिल्ह्यातील अर्धमसला मस्जिद ब्लास्ट मधील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १०८/२५ दिनांक ३०/३/२५ रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

आरोपी विरुद्ध यूएपीए, मकोका अथवा एनएसए अंतर्गत कारवाई करा

आरोपींनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवली असल्याने त्यांच्या वृत्तीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा १९८० प्रमाणे कारवाई करण्यात यावी तसेच सदर आरोपींनी भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडेते च्याविरुद्ध कारवाई केलेली आहे म्हणून त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा १९६७ लागू होतो कारण त्यांनी भारतातील बेकायदेशीर कारवाया थांबवणे व दहशतवादाचा सामना करणे हा या कायद्याचा उद्देश असल्याने

यूएपीए अंतर्गत कारवाई करावी. एवढेच नव्हे तर सदर आरोपींनी संघटित गुन्हेगारीने दहशतवादाचे कृत्य केलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने १९९९ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका अस्तित्वात आणला असल्याने या आरोपींवर या कायद्यान्वये कारवाई करणे आवश्यक असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.

चेहरे व जात बघून कायदे,कलमे लावू नका: मागणी

आरोपींना जात नसते तसेच राज्य शासनाच्या प्रमुख व पोलिसांना सुद्धा जात पातच्या पलीकडे त्यांचे कार्य असते म्हणून त्यांनी राजधर्माचे पालन करावे व पोलिसांनी कायद्यानुसार आरोपी विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षित मागणी जळगाव जिल्हा एकता संघटनेने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली असून या तक्रार अर्जाची प्रत महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक मंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक बीड, तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव व पोलीस निरीक्षक जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव तसेच पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलेली आहे.

तक्रार अर्जावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या

लोक संघर्ष मोर्चाच्या श्रीमती प्रतिभा शिंदे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, सावदा चे माजी उपनगराध्यक्ष सय्यद अजगर, गुड्डू मेंबर ,असलम खान व शमसोद्दिना, मुफ्ती खालीद, मौलाना रहीम पटेल, अनिस शाह, नदीम मलिक, मजहर पठाण , मतीन पटेल, आरिफ देशमुख, ताहेर शेख, सय्यद चांद , सलीम इनामदार, नजमोद्दीन शेख, इमरान शेख, सईद शेख, अबू राफे , अकील शेख, समीर शेख ,रज्जाक पटेल, अल्ताफ (चाळीसगाव) जावेद शेख, इम्रान शेख, जकी पटेल, आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

सदर तक्रार अर्ज जकी पटेल यांनी वाचून दाखविला, फारुक शेख यांनी त्याचे विश्लेषण केले. प्रतिभा ताई यांनी कारवाई ची मागणी रेटली. अप्पर जिल्हादंडधिकारी गजेंद्र पाटोळे यांना शिष्टमंडळाने तक्रार अर्ज सादर केला यावर सदरचा अर्ज मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्याचे आश्वासन पाटोळे यांनी शिष्ट मंडळास दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button