जळगावसामाजिक

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आव्हाणे ग्रामपंचायतीत जनजागृती अभियान

जळगाव (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आव्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब भगवान चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बोलताना चौधरी यांनी माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांचे प्रभावी शस्त्र असल्याचे सांगितले. “माहिती ही लोकशाहीचा गाभा आहे. प्रशासनाचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व अधोरेखित करणारा हा कायदा आहे. त्यामुळे जनहितासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून नागरिकांनी माहिती अधिकाराचा जाणीवपूर्वक वापर करावा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी सरपंच पती भगवान नामदेव पाटील यांनी बापुसाहेब चौधरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. अभियानादरम्यान उपस्थितांनी पारदर्शकता व जबाबदारीसाठी माहिती अधिकाराचा जागरूकतेने उपयोग करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button