जळगावशैक्षणिक

कलाविकासाच्या दिशेने श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे एक सकारात्मक पाऊल..!

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये Step Up Dance Class च्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी डान्स क्लासचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कलागुणांचे जतन आणि जोपासना देखील तितकीच महत्त्वाची आहे, आणि नृत्य ही त्यातील एक महत्त्वपूर्ण कला आहे. या नृत्यकलेचा प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या Step Up Dance Class च्या कुमारी गौरी जगताप यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला भाऊसाहेब जगताप व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button