राज्यराजकारण

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ

मुंबई- नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला असुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन वसंतराव सपकाळ या नविन चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल आणि पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव या पदावर देखील त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असतांना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button