सामाजिकजळगाव

के. जी. पाटिल हायस्कूल येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नांडगाव येथे संपन्न

बोडवड – १८जानेवारी २०२५ रोजी के. जी पाटील हायस्कूल नाडगाव ता. बोदवड येथील विद्यालयातील सन २००१ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा गेटटुगेदर मोठ्या जल्लोषात नाडगाव येथे पार पडला. यावेळी सर्व माजी शिक्षकांचे आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर दीपप्रज्वलन करुन जे माजी विद्द्यार्थी व शिक्षक यांचे निधन झाले, त्या सर्वाना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व पुढील कार्यक्रम अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी सर्वजन खुप आनंदात होते, परंतू एवढे सर्व वर्गमित्र एकाच वेळी भेटले असल्यामुळे जितका आनंद चेहर्यावर होता, तितकेच भावुक सुद्धा झाले. सर्वानीच आप-आपले मनोगत व्यक्त करुन आता पर्यंतच्या जीवन प्रवास मोजक्याच शब्दात व्यक्त केला. प्राध्यापक उल्हास पाटील यांनी “मिञ वनव्या मध्ये गारव्या सारखा” हे गीत गात सर्वांच्या ह्रुदयात प्रेमळ भावना जागवली. प्रा.परदेशी सर, चौधरी सर उल्हास पाटील सर, भंगाळे सर, इंगळे सर, जप्ते सर, लांजुळकर सर या सह सर्व माझी विद्यार्थी जमले होतें. सर्व वर्गमित्रांनी मनसोक्त एकमकांंना घास भरवून भोजनाचा आस्वाद घेतला. जेवन खुप सुंदर छान झाले अशी प्रतिक्रीया सर्वानींच दिल्या. दिवस भर अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.यावेळी काही माजी विद्द्यार्थी भावुक झाले व रडले आणि सर्वानांच भावनिक केले. प्रत्येकाचा आता पर्यंतचा जीवन संघर्ष हा वेगळा जरी असला तरी कोरोना सारख्या आजावर मात करुन आपण सर्व भेटलो याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसत होता.

पुन्हा लवकरच गेट टुगेदर पुढच्या वर्षी लवकर व्हावे अशी आशा सर्वानीच व्यक्त केली. व्यतिगत कारणास्तव काही माजी विद्यार्थाना उपस्थित राहता नाही आले त्यामुळे त्यानी फोन वरुन आपआपली दिलगीरी व्यक्त केली. यामुळे मनाला थोडी खंत वाटत होती. परंतु असो मित्रहो पुढच्या गेटटुगेदरला नक्कीच भेटु असा आशावाद त्यांनी मोबाईल वरुन व्यक्त केला. त्यानंतर सर्वानाच पुढिल भावी संसारिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button