जळगावप्रशासकीयराजकारण

गृहभेटीद्वारे १७३ पैकी १६२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.

गृहभेटीद्वारे १७३ पैकी १६२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.

एरंडोल :- एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी आज दि. 08/11/2024 रोजी 16 एरंडोल मतदार संघात मतदान केंद्रांवर 173 मतदारांसाठी विधानसभा मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा एक भाग म्हणून जेष्ठ नागरिक व दिव्यांग जनांचे गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली.

दरम्यान गृहमतदानाचे उद्देश मतदानाची टक्केवारी वाढविणे, वृद्ध व दिव्यांग

मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत.यांसाठी निवडणूक आयोगाने गृहभेटीद्वारे मतदान

ही संकल्पना राबविण्याचे ठरविल्याने एरंडोल विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय

अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप पाटील तहसीलदार एरंडोल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उल्हास देवरे तहसीलदार पारोळा, सहाय्यक निवडणूक

निर्णय अधिकारी अमोल बागुल मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल तसेच नोडल अधिकारी विजय अहिरे सहाय्यक गटविकास अधिकारी एरंडोल यांच्या सहकार्याने सदर प्रक्रिया पार पडली.गृहमतदानाची सुविधा प्राप्त झाल्याने 85+ (वयोवृद्ध) मतदार व दिव्यांग मतदार बंधू भगिनीसाठी मतदानाची सुविधा घरोघरी जाऊन उपलब्ध करून दिली.यात १७३ मतदारांपैकी १६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर यातील ४ मतदार मयत असल्याने ३ स्वतः येणार व २ सक्षम नसल्याने तर १ मतदानाला येणार नसल्याने व १ सादर करणार असल्याने ते मतदान झाले नाही.सदर प्रयोग चांगल्याप्रकारे यशस्वी झाल्याने वृद्ध व दिव्यांगजनांनी समाधान व्यक्त केले. यासाठी मतदान अधिकारी यु.बी.निंबाळकर,प्रशांत बाविस्कर,मधुकर नंदनवार,सुयोग कुलकर्णी,संजय साळुंखे,दिनेश येडे,मोनिका मोरे,महेश जाधव,अल्ताफ पठाण,शेखर तडवी,सागर कोळी,वैभव पाटील,पंकज भोई आदी नियुक्त कर्मचाऱ्यांनी सदर कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button