प्रशासकीय

*चोपडा येथे कास्ट्राईब वन कर्मचाऱ्यांची सभा संपन्न*

*चोपडा येथे कास्ट्राईब वन कर्मचाऱ्यांची सभा संपन्न*

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेची सभा विविध विश्यावर चोपडा येथे पार पडली वनसंरक्षक प्रादेशिक धुळे यांचे दालनात पारपडलेल्या सभेतील विषयावर चर्चा करणेत आली. या बैठकीत राज्याचे अति.सरचिटणीस प्रभाकर पारवे साहेब यांनी कर्मचाऱ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले,कर्मचारी संघटित राहिल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत नाही याची सर्व सदस्य पदाधिकारी यांना जाणीव करून देण्यात आली. सर्वप्रथम कास्ट्राईब वन कमचारी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या बैठकीला नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे, कास्ट्राईब वनकर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष योगीराज तेली, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, महासंघाचे कार्याध्यक्ष योगेश अडकमोल,कास्ट्राईब महानगरपालिकेचे कार्याध्यक्ष नंदकुमार गायकवाड, शिक्षक संघटने तालुका अध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव किशोर साळुंके आदि उपस्थित होते. तसेच वन कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे सोनाली बारेला, जनाबाई भादले, हेमलता बारेला, बानू बारेला, भारसिंग बारेला, आर बी थोरात, एन एस बारेला उपाध्यक्ष, एस एस पावरा आदी कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे सर्वच सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रोहित पावरा यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button