

जळगाव – पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते, तथा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पाचोरा तालुका अध्यक्ष पंकज राजेंद्र पाटील यांची छावा मराठा युवा महासंघाच्या पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नियुक्तीपत्र देऊन पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. पाचोरा तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये पंकज पाटील यांनी सातत्याने भ्रष्टाचार व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या विरोधात लढून पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे प्रामाणिक झुंजार व निर्भीड कार्यकर्ता अशी त्यांची ओळख तयार झाली आहे. छावा मराठा युवा महासंघाच्या माध्यमातून अधिक व्यापक व लोकाभिमुख काम करण्याचा त्यांचा मानस आहे. सदर नियुक्ती बद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते व समस्त मित्र परिवाराकडून पंकज पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




