

जळगाव : एस.सी.ई.आर.टी. महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अध्यापिका विद्यालय, जुना आग्रा रोड, नाशिक येथे विभागस्तरीय कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील इ.१२वी कला शाखेची प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी कु. समीक्षा लक्ष्मीकांत माकोडे हिने जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
याआधी १ सप्टेंबर रोजी के.सी.ई. अध्यापक विद्यालय, जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सवात प्रथम क्रमांक मिळवत समीक्षाने विभागस्तरासाठी पात्रता मिळवली होती. तिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या संगीत शिक्षिका प्रा. मयुरी हरिमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
समीक्षाच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, सांस्कृतिक समन्वयक श्री. शशिकांत वडोदकर, उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.




