

जळगाव – जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे धरणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी श्री रवींद्र रमेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी आहे. याप्रसंगी उपस्थित जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील, विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया, नरेन्द्र नाना नेहेते, जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी, पांडूरंग महाले, दिलीप शिरूडे, दिपक नगरे व सर्व कार्यकारीणी व पदाधिकारी , सदस्य यांनी अभिनंदन केले.




