जळगावप्रशासकीय

जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश वाटप

जळगाव (१२ सप्टेंबर) : जळगाव जिल्हा परिषदेत गट ड संवर्गातील परिचर पदावर तब्बल ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली. शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या समुपदेशन प्रक्रियेनंतर उमेदवारांना थेट नियुक्ती आदेश देण्यात आले.

या प्रक्रियेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल उपस्थित राहिल्या. त्यांनी संपूर्ण कार्यवाही पारदर्शक आणि सुबक पद्धतीने राबविली असल्याचे नमूद केले. जवळपास वर्षभरानंतर झालेल्या अनुकंपा भरतीमुळे उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

समुपदेशन कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, उपयुक्त जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. प्रदीप झोड, कृषी विकास अधिकारी पद्भ्नाभ म्हस्के यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button