जळगावप्रशासकीय

जळगाव जिल्ह्यात २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव –  वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोक अदालतांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोक अदालतीमध्ये नागरी वाद, मोटार अपघात प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मजुरी दावे, दिवाणी प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेत असलेले थकबाकीचे प्रकरणे तसेच इतर तडजोडी योग्य प्रकरणे सोडविण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा राष्ट्रीय लोक अदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

तसेच लोक अदालतीमध्ये प्रकरणे सोडवण्यासाठी तडजोडीला महत्त्व दिले जाईल. यामुळे संबंधित पक्षकारांना वेळेची आणि पैशांची बचत होईल आणि प्रकरणांचा निकाल जलद गतीने लागेल. ज्या नागरिकांना त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत सोडवायची असतील त्यांनी २२ मार्च २०२५ पूर्वी आपल्या वकिलांशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button