जळगावप्रशासकीय

जळगाव महानगरपालिकेची नागरिकांना सवलतीची सौगात – मालमत्ता कराच्या आगाऊ भरण्यावर 10% सूट!

जळगाव : जळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता मिळकत धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या नागरिकांना 10% सवलतीची योजना महानगरपालिकेचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार दिनांक 21 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत अवघ्या तीन दिवसांत म्हणजे 23 एप्रिल 2025 अखेर प्रभाग समिती क्र. 1 ते 4 अंतर्गत एकूण 4.27 कोटी रुपयांचा कर भरणा झाला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

प्रभाग समिती क्र. 1 : 1.35 कोटी रुपये

प्रभाग समिती क्र. 2 : 65.30 लाख रुपये

प्रभाग समिती क्र. 3 : 84.88 लाख रुपये

प्रभाग समिती क्र. 4 : 1.41 कोटी रुपये

ही योजना केवळ 30 एप्रिल 2025 पर्यंतच लागू असणार आहे. त्यामुळे जळगाव शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपला मालमत्ता कर आगाऊ भरून 10% सवलत मिळवावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर ढेरे व उपायुक्त (महसूल) श्रीमती धनश्री शिंदे यांनी केले आहे.

जळगाव महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना दिली गेलेली ही सवलत योजना म्हणजे एक सकारात्मक पाऊल असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपली कर भरण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button