जळगावप्रशासकीयसामाजिक

जळगाव शहर महानगरपालिका व रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन : 103 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (दि. 14 मे 2025) – देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता, भारतीय सीमेवरील जवान तसेच शहरातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका व इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची असून, यास प्रेरणा केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ तसेच आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्याकडून मिळाली.

शिबिराचे उद्घाटन आज सकाळी 10:30 वाजता आमदार सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे, अपर आयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त निर्मला गायकवाड (पेखले), उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ विजय घोलप,  रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्त केंद्र चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव सुभाष साखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, डॉ शंकरलाल सोनवणे यांच्यासह म्हणगपालिका आणि रेडक्रॉस चे मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून एकूण 103 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे विशेष योगदान राहिले. या यशस्वी आयोजनात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरले.

रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, आयुक्त ढेरे यांनी येत्या 19 मे 2025 रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील रक्तदान शिबिरात शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव शहर सामाजिक जाणीवेतून एकत्र येत असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button