जळगावसामाजिक

जीवनात आनंदी,व्याधीमुक्त राहण्यासाठी गोसेवा आवश्यक; शेकडो आजार गोमूत्रामुळे सहज बरे होतात – गोपालाचार्य स्वामी महाराज.

जळगाव — पांजरापोळ संस्थेत जळगाव शहरात प्रथमच भव्य पाच दिवसीय विशेष गौकथेचे आयोजन पांजरापोळ संस्था माहेश्वरी महिला मंडळाच्या सहयोगाने करण्यात आले होते आज समारोप प्रसंगी गोसेवेत अग्रणी पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी व त्यांचे गुरु महाराज पूज्य गोपालाचार्य स्वामी महाराज यांनी आपल्या मुखार विंदातून गोकथा कथन करतांना सर्व प्रथम गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देऊन, गोहत्या बंदी कायदा देशात लागू केल्यास आपला देश सुदृढ,सशक्त होईल.

जीवनात आनंदी व्याधीमुक्त व सकारात्मक राहण्यासाठी गोसेवा आवश्यक आहे. शेकडो आजार नुसत्या गोमूत्रापासून आपण लांब ठेवू शकतो महाराजांनी देशातील विविध ठिकाणी गोसंपर्क, शेण,गोअर्क दूध,दही, ताक सारख्या उत्पादनापासून कशा पद्धतीने आजार दूर केले याबाबत माहिती दिली.

विविध पवित्र पुराणांमध्येही गोसेवेला प्रथम प्राधान्य असून आज घराघरात गोसेवा अति आवश्यक आहे. भारतीय संस्कृती परंपरा टिकवायची असेल तर आपण सर्वांनी मिळून गोसेवा अधिक प्रमाणात केली पाहिजे व गोहत्या थांबविली पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आज आईचे दूध दही तूपु आणि विशेष ताक अमृता समान असून महाराजांनी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विविध उपचारांबद्दल यावेळी शास्त्रीय माहिती प्रदान केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button