नाहाटा महाविद्यालयामध्ये स्व.बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन उत्साहात


नाहाटा महाविद्यालयामध्ये स्व.बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन उत्साहात
भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालयात दिनांक 3 डिसेंबर रोजी स्व. बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन असल्याने साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. वाय एम पाटील कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील यांच्यासोबतच प्रमुख वक्ते डॉ. दिनानाथ पाठक हे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम स्व.बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन साजरा करण्यात आला यानंतर प्रमुख वक्ते डॉ. दिनानाथ पाठक यांनी लेवागणबोली दिनाचे महत्त्व विशद केले यावेळी त्यांनी विद्यापीठात लेवागणबोली दिनाविषयी असलेली जनजागृती याचा वापर केला तसेच स्व.बहिणाबाई चौधरी यांचे लेवागणबोलीवर विशेष कार्य यावर प्रकाश टाकला, त्याचप्रमाणे लेवा भाषा आणि लेवा गणबोली यातलं साधर्म्य कसं आहे या विषयावर अनमोल असे उद्बोधनपर मार्गदर्शन केले तसेच भविष्यात लेवागणबोली टिकली पाहिजे म्हणून आपण कोण कोणती उपाययोजना कराव्यात व कशा पद्धतीने ही बोली टिकवावी याविषयी देखील मार्गदर्शन केले तसेच त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील जीवनाचे तत्त्वज्ञान आणि लेवागणबोली याविषयावर खूपच सुंदर असे मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



