जळगाव

नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

जळगाव – येथील नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व एन.सी.सी. युनिट, एम. जे. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा एम.जे. कॉलेज, एन.सी.सी. युनिट येथे 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर ‘ माय भारत पोर्टल ‘विषयी एन.सी.सी. छात्र सैनिकांना माहिती दिली. नशामुक्ती फक्त व्यक्तिशः नाही तर देशाला कसे हानिकारक ठरू शकते तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान याविषयी छात्रसैनिक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून हा संदेश समाजात पोहचवण्याचे आवाहन सी.टी.ओ सोनल उप्लपवार यांनी प्रस्ताविकात केले. एम.जे. कॉलेज मधील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. बालाजी राऊत यांनी ‘मोबाईल एडीक्शन ‘ या विषयावर सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. या कार्यक्रमास 110 छात्रसैनिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखा अधिकारी श्री अजिंक्य गवळी केले व सूत्रसंचालन सी.टी.ओ. गोविंद पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button