जळगावप्रशासकीय

पंचशील नगरात अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन कामाचा शुभारंभ; विनोद सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ : गेल्या अनेक दिवसांपासून पंचशील नगरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. वारंवार मागण्या करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला, यासह वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेऊन नागरिकांची व्यथा मांडली. सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर कामाविषयीचे अडथळे दूर केले आणि कामाला मंजुरी मिळवून दिली.

त्यामुळेच प्रभाग क्रमांक १८ मधील पंचशील नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला असून अमृत योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे पंचशील नगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या कामाचे उद्घाटन विनोद सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी नितीन धांडे, माजी नगरसेवक मुश्ताक शेख, मुन्नाभाई सोनवणे, बंटि नरवाडे, जावेद शेख,आसीफ बागवान, निखिल सपकाळे, इंजिनिअर योगेश माळी, राहुल माळी, अल्ला बक्ष यांच्यासह भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, अमृत योजनेचे अधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक यांची मोठ्या प्रमावावर उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button