

जळगाव (दिनांक ११) – श्री.चामुंडा माता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.पी.ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत रक्तदान संकलन व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जि. प. उच्च प्राथमिक शाळा,चिंचोली येथील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळले त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी डॉ. जयेश वाल्हे यांनी केली. तसेच डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ.संदीप पाटील,डॉ. अमिता श्रीवास्तव,डॉ. सोनाली मोरे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारखेडे सर, जोगी सर उपस्थित होते. महाविद्यालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, विद्यार्थी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मंडळी असे एकूण ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


याप्रसंगी श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री.राहुल पाटील सर, प्राचार्य.डॉ. समीर साखळीकर, भूषण पाटील सर कॉलेजचे सर्व प्राध्यापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी आमदार मनीषजी जैन, सुभाष साखला, रेडक्रॉस सोसायटीचे मनोज बियाणी व इतर मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय पाटील,चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतली.




