

जळगाव – पांडुरंग मुरलीधर मुंदडा माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येथे शैक्षणिक वर्ष 1999-2000 मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर आलेल्या सर्व आजी-माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्रमुख शिक्षक श्री. राजेंद्र उंबरकर, सौ. मालती गायकवाड, सौ. रंजना नारखेडे, श्री. विठ्ठल राजोळे, श्री. जगदीश बियाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी किशोर वाघ, शिवाजी सोनवणे, रजनीकांत ठाकूर, संध्या शिंपी, पुनम कोळी, भाग्यश्री परदेशी, कल्पना पाटील, रामसिंग पाटील यांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत एक अनोखा nostalgiic क्षण अनुभवला.
कार्यक्रमाला जवळपास 100 माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक शिवाजी सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद आढाळके, संध्या शिंपी व शिवाजी सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन रजनीकांत ठाकूर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दशरथ पुजारी, सागर पवार, दीपक बारी, आनंदा जाधव, धनराज सोनवणे, किरण भोई, महेंद्र पाटील, धर्मराज कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर कुमावत यांचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी केवळ एक आठवणींचा दिवस नव्हता, तर तो त्यांच्या शालेय जीवनाशी नव्याने नाते जुळवणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.




