

जळगाव :- बोध चिन्ह तयार करण्याची कला आदिम काळा पासून चालत आली असून ती त्या त्या समूहाची अस्मिता राहिलेली आहे . या करिता चित्रकाराला दूरदृष्टी , व्यासंग , डोळसपणा, कल्पकता आवश्यक आहे .असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार तथा फाय फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त श्रीधर अंभोरे यांनी केले .
नोव्हेंबर मध्ये जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे बोध चिन्ह दिनांक 5 ऑक्टोबर रोजी जळगाव येथील अभियंता भवन मध्ये श्रीधर अंभोरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले , या प्रसंगी ते बोलतांना ते म्हणाले की, ” चित्रकाराची भाषा समजणे थोडे अवघड असते , त्यात अनेक प्रतिमा , मिथक असतात , इतिहास असतो , सांकेतिक भाषा असते त्याच बरोबर एका चित्राचे अनेक अर्थ निघत असतात ते समजून घेणे फार गरचेचे असते नाहीतर गैरसमज निर्माण होऊन प्रसंगी अनुचित प्रकार घडू शकतो.”
स्वागताध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी या प्रसंगी भारतात संविधान कसे अपमानित होत असून त्याच्या सन्मानाची गरज प्रत्येक भारतीयाची असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संविधानातील राष्ट्रवाद विषद करून आज देशात जातीयता , धर्मांधता वाढत असल्याचे सांगितले .
मंचावर प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ , प्रसिद्ध उद्योगपती संजय इंगळे मुख्य अतिथी म्हणून हजर होते . या प्रसंगी श्रीधर अंभोरे यांचा सत्कार जयसिंग वाघ यांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल , सूत्रसंचालन प्रा. प्रितलाल पवार तर आभारप्रदर्शन अनिल सुरळकर यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य एस. एस. राणे , भारती रंधे , ॲड. आनंद कोचुरे , पुष्पा साळवे आदींसह बहुसंख्य स्त्री पुरुष हजर होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज माळी , संगीता माळी , चेतन नन्नवरे , आ. बा. सपकाळे , जगदीश सपकाळे , प्राचार्य मंगल पाटील , डी. एम. भालेराव , विजयकुमार मौर्य , डीगंबर सुरवाडे , दिलीप त्र्यंबक सपकाळे यांनी परिश्रम घेतले .




