जळगावसामाजिक

भारत जोडो व सिव्हिल सोसायटी तर्फे तुषार गांधी यांच्या सभेचे आयोजन.

जळगाव – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो समूह आणि सिव्हिल सोसायटीच्या वतीने सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी दि.16 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री. तुषार गांधी यांची सभेचे आयोजन केलेले आहे.

तुषार गांधी हे महात्मा गांधींचे पणतू असून विख्यात लेखक आहेत. त्यांची ‘Let’s Kill Gandhi ‘ आणि ‘ Lost Diary of Kastur My Baa’ ही पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. जळगांव साठी महत्वाची ओळख म्हणजे ते “गांधी रिसर्च फाउंडेशन” (GRF )चे विश्वस्त आहेत. अनेक पुरोगामी, गांधीवादी संस्था संघटनांशी ते सहचिंतक, मार्गदर्शक म्हणून जोडलेले आहेत तसेच सध्याच्या लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात चालू असलेल्या विविध आंदोलनात त्यांचा सहभाग आहे.

भारत जोडो हा देशाच्या राजकारणात सामान्य नागरिकाचा, दलित शोषित घटकांचा आवाज उठवणाऱ्या विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, जनसंघटनांचा समूह आहे. त्यांच्या सोबत समाजातील सुविद्य,सुजाण, सहिष्णू नागरिकांना सहभागी करून हे लोकचळवळ लोकसभा,विधानसभा निवडणुकीत आपली लोकशाही संविधान रक्षक भूमिका बजावत आहे. देशात संसदीय राजकारणाची तत्वशून्यतेकडे होणारी वाटचाल, पैशाचं वर्चस्व आणि जनतेची ससेहोलपट या पार्श्वभूमीवर भारत जोडतो समुहाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.या निमित्ताने तुषार गांधी यांना संवेदनशील, सुजाण नागरिकांच्या सज्जन शक्तीची संसदीय राजकारणातील महत्त्वाची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले आहे.

सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन भारत जोडो समूहाचे समन्वयक अविनाश पाटील, वासंती दिघे, जयसिंग वाघ, सतिश सुर्वे, फईम पटेल, अमोल कोल्हे, रमेश भोळे, हर्षल पाटील, अजय पाटील, आरिफ देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button