

जळगाव : दि.२४ ऑगस्ट २०२४ (रविवार) कमल गणपती हॉल,शांतीनगर भुसावळ येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३९ महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न होत आहे.सदर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम भूषविणार असून सत्यशोधक शेतकरी सभेचे महारष्ट्र राज्य संघटक मा. कॉ.किशोर ढमाले हे उद्घाटक म्हणून उपस्थित असणार आहेत.तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मगन ससाणे (राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमपीए, नवी दिल्ली) अॅड. राजेश झाल्टे (जेष्ठ विधी तज्ञ), व्ही. व्ही. जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ, नवी दिल्ली) दिपक वासनिक (राष्ट्रीय समीक्षा प्रभारी, बामसेफ, नवी दिल्ली) माया जमदाडे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, महिला विंग) संदीप मानकर (राष्ट्रीय प्रभारी, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, नवी दिल्ली) डॉ. अनिलकुमार माने (राष्ट्रीय अध्यक्ष, बीएमपी, युवा प्रकोष्ट, नवी दिल्ली), पी.के. मेश्राम (सी.ई.सी. सदस्य, बामसेफ, नवी दिल्ली), शिवाजीनाना पाटील (वरीष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा), मौलाना उमरैन महफूज रहेमानी (जनरल सेक्रेटरी मुस्लीम प्रर्सनल लॉ बोर्ड) प्रा.डॉ. दयानंद गोगले (राष्ट्रीय अध्यक्ष, प्रोटॉन, नवी दिल्ली), नितीन गायकवाड (सी.ई.सी. सदस्य, बामसेफ, नवी दिल्ली) डी. आर. गायकवाड (सी.ई.सी. सदस्य) बी. एस. हस्ते (राष्ट्रीय संरक्षक, नफ), प्रमुख अतिथी सुर्यकांत पाटील (रिटायर्ड पोलीस कमिशनर, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ, सोलापूर) अॅड. गुणवंत रामटेके ( अधिवक्ता, जिल्हा न्यायालय, नागपूर) डॉ. रघुनाथ बोरकर (पुरातत्व शास्त्रज्ञ, नागपूर) आदींसह विशेष उपस्थितीमध्ये नरेश पांडुरंग गेडाम पाटील (निवृत्त नगर रचनाकार, महाराष्ट्र) डॉ. प्रमोद बळवंत भोसले (विक्रीकर उपायुक्त) प्रशांत निनावे ( ओबीसी विचारवंत, नागपूर )आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सकाळी १०: ३० ते सायंकाळी ७ :०० पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात वर्तमान भारतातील अत्यंत ज्वलंत विषयावर चर्चा घडवून आणली जाणार आहे .त्यामध्ये प्रामुख्याने ‘कॉंग्रेस-भाजपा या पक्षाकडून इ.व्ही.एम.चा गैरवापर करून लोकशाही शासन प्रणालीवर अनिंयत्रित नियंत्रण स्थापित करून बहुजनांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे;एक चर्चा २.आपला जन्म ज्या समजात झाला त्या समाजाच्या उथानासाठी जे तरुण आपले तन-मन-धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत.३.बहुजन समाजातील सर्व सामाजिक समूहाचे बूथ लेवलवर संघटनात्मक जाळे निर्माण केल्याशिवा राष्ट्रव्यापी आंदोलनाला गती मिळणार नाही एक चर्चा ४.मुस्लीम,ख्रिश्चन,जैन,लिंगायत बौद्ध यांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना आपापसात लढवून त्यांना विभाजित केले जात आहे ;एक विश्लेषण ५.ओबीसीची जात निहाय जन गणना करण्याचे घोषित करणे ,मात्र २०११ च्या सामाजिक/आर्थिक जनगणनेची आकडेवारी घोषित न करणे म्हणजे ओबीसी भावांच्या मतांचा निवडणुकीत गैरवापर करून ब्राह्मणी सत्ता स्थापित करण्याचे भाजप –कॉंग्रेसचे षडयंत्र आहे –एक गंभीर चर्चा या आणि इतरही मोलिक विषयावर दोन सत्रात चर्चा होणार आहे.
प्रस्तुत अधिवेशनासाठी महाराष्ट्र भरातून बहुजन समाजातील जवळपास १०,०००( दहा हजार) प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनास सर्व मुलनिवासी बंधु-भगिनींनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहुन सहकार्य करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य बामसेफ व सर्व सहयोगी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व उपस्थित राहण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.8329292004, 9764133404, 9860637860, 9763671654, 9765201024, 7420079841




