जळगावसामाजिक

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात जळगावकर सर्व ताकतीने उतरणार : जयसिंग वाघ 

जळगाव :- जळगाव येथील महाराष्ट्र बौद्ध समाज सेवा संघ च्या १६ बौद्ध प्रतिनिधींनी बुद्ध गया येथे जाऊन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. या आंदोलना प्रसंगी त्यांनी गया येथील स्टेशन परिसरात प्रचंड घोषणाबाजी केली , त्यानंतर गयाचे जिल्हाधिकारी तथा महाविहार समन्वय समितीचे अध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन दिले , अप्पर जिल्हाधिकारी कुमार पंकज यांनी सुमारे अर्धातास या संबंधी चर्चा केली , या प्रश्नावर सामाजिक , धार्मिक सलोखा कायम राहील या अनुषंगाने आपण काम करावे असे सांगून आपल्या भावना बिहार सरकारला कळविल्या जातील असे आश्वासन दिले . त्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली .

त्यानंतर बुद्ध गया येथे १२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे , गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अश्या घोषणा देत देत अर्धा किलो मिटर पर्यंत रॅली काढण्यात आली. आंदोलनस्थळी मुख्य भंतेजि प्रज्ञा शील महाथेरो यांची भेट घेवून या अनुषंगाने चर्चा केली .

या प्रसंगी मुख्य संयोजक जयसिंग वाघ यांनी अत्यंत जोरदार व आवेशपूर्ण भाषण करून जळगाव जिल्ह्यात करण्यात असलेल्या सर्वच आंदोलना विषयी विस्तृत माहिती दिली त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यातून आम्ही १०००० सह्या मिळविल्या याचाच अर्थ आम्ही किमान २५ हजार लोकांना हा प्रश्न समजून सांगितला . आमचा लढा जो पर्यंत आपण बौद्ध भिक्खू या प्रश्नावर आंदोलन चालू ठेवतील तो पर्यंत सर्व ताकतीनिशी चालूच ठेवू असे स्पष्ट केले . सुरवातीस बटूजी शुक्ला , रामजी शुक्ला यांनी जयसिंग वाघ , ॲड. आनंद कोचुरे व अन्य आंदोलकांचे स्वागत केले .

या प्रसंगी सहसंयोजक ॲड. आनंद कोचुरे यांनी या आंदोलनात आलेले विविध अनुभव सांगितले . प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी बुद्ध गयाचा इतिहास मांडून हे स्थळ अशोकाच्या काळापासून बौद्ध जनाचे पुजास्थळ असल्याचे सांगितले . बाबुराव वाघ यांनी महाबोधी महाविहार हे स्थळ अत्यंत पवित्र स्थळ असून त्याला जागतिक वारसा आहे असे सांगितले .

प्रसिद्ध गायक शरद भालेराव यांनी गीत सादर करून सर्वांना आकर्षित केले , प्रा. हरिश्चंद्र सोनवणे यांनी भंतेजी वर्ग जागतिक पातळीवर एकसंघ झाला असून हे आंदोलन विविध देशांमध्ये सुध्दा सुरू असल्याचे सांगितले . राजूभाई मोरे यांनी या आंदोलनाने बौद्ध धर्मीय जनतेत बुद्ध विचार अधिक प्रमाणात रुजत असल्याचे नमूद केले .

सुभाष वाघ , उदय सपकाळे , डॉ. सी. यू. भालेराव , अशोक सैंदाणे , नथु अहिरे , डी. झेड. मोरे , प्रा. चंद्रशेखर अहिरराव , रामभाऊ शिरसाठ यांनी सुध्दा आपले विचार मांडून आम्ही या पुढं सुध्दा हे आंदोलन करत राहू असे सांगितले .

बुध्दीस्ट फोरम ऑफ इंडिया चे मुख्य सल्लागार भंते प्रज्ञाशिल थेरो यांना जयसिंग वाघ , आनंद कोचुरे यांनी आपले लेखी निवेदन दिले असता भंते प्रज्ञा शील थेरो यांनी आंदोलनाची विस्तृत माहिती देऊन सर्व जळगावकरांचे आभार व्यक्त केले .

संध्याकाळी आंदोलनस्थळी संयोजक जयसिंग वाघ , गायक शरद भालेराव , रंगकर्मी उदय सपकाळे , प्रा. हरिश्चंद्र सोनवणे यांची मुलाखत घेण्यात आली . भंते प्रज्ञाशील यांच्या सूचनेनुसार शरद भालेराव यांनी दोन बुद्ध , बाबासाहेब व महाविहार यांचे विषयी एक एक गीत सादर केले . रात्री बारा वाजता जळगावचे आंदोलक आंदोलनभूमी वरून निघाले .

जळगाव येथील आंदोलकांना चेतन नन्नवरे , आ. बा. सपकाळे , सचिन वाघ , डॉ. उल्हास तासखेडकर, सचिन बडगे , दिलीप सपकाळे , रवी कोलते , विजया शेजवळे , विनोद रंधे , सुनील देहाडे यांचे विविध प्रकारचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button