

जळगाव – महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ (संलग्न – भारतीय जनता कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य) यांच्या जळगाव शाखेची प्रथम सभा आज दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव येथे उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थानी श्री. विजय मोहरकर, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ होते.
या बैठकीस मा. आमदार संजयजी केनकर, प्रदेश अध्यक्ष – भारतीय जनता कामगार महासंघ, महाराष्ट्र, यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी संघटनेची ध्येयधोरणे, पुढील वाटचाल आणि आरोग्य कर्मचार्यांसमोरील विविध प्रश्न यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर संघटनेच्या जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये श्री. प्रकाश रमेश पाटील (आरोग्य सेवक, प्रा. आ. केंद्र नशिराबाद) यांची जिल्हाध्यक्ष पदी, श्री. अतुल रामदास माळी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, श्री. प्रदीप सुरेश बोरसे यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार राज्य अध्यक्ष तसेच उपस्थित आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी अतुल सोनवणे, किशोर माळी, गजानन काकडे, सुनील ढाके, फुगे साहेब, पंकज तायडे, संदीप पाटील, मुकुंद वानखेडे आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी व प्रश्नांच्या प्रभावी निवाड्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




