जळगावप्रशासकीय

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात 14 केंद्र ; सर्व केंद्रावर असणार सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर*

जळगाव दि. 9 – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जळगाव शहरात 14 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्या सर्व केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आल्या आहेत. कोणीही गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जळगाव शहरातील सर्व 14 परीक्षा केंद्रांचे सीसीटीव्ही ऍक्टिव्ह करण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्षात नियंत्रित करण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button