जळगावप्रशासकीय

*माजी सैनिकांच्या अथवा विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*माजी सैनिकांच्या अथवा विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

जळगाव दि.13 ( जिमाका ) :- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या अशा माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधित माजी सैनिक अथवा दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची २० डिसेंबर २०२4 पर्यंत छाननी केली जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे. ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणांसोबत गॅप प्रमाणपत्रासह (प्रतिज्ञापत्र) अर्ज सादर करावा लागणार आहे. डिप्लोमानंतर द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांचेही अर्ज स्विकारले जाणार आहेत तसेच सदर अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या गुणांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button