जळगावक्रिडा

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा १४ वर्षातील मुलींचा संघ घोषित व रवाना

जळगाव – वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा १४ वर्षा आतील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा शिरपूर येथील मिलिटरी हायस्कूल येथे १९ मे पासून सुरुवात होत आहे. फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी संघाची घोषणा केली. वरिष्ठ उपाध्यक्ष इम्तियाज शेख व सचिव फारुक शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

सदर संघात संस्कृती तुषार पाटील,अश्विनी लक्ष्मीकांत, दिव्या रुपेश बाविस्कर,परी चंदन रंगलानी, मनस्वी देविदास जाधव, ईशा रवींद्र ढाके (भुसावळ ), युक्ती भूपेंद्रसिंग राजपूत (गोलकीपर), आरोही स्वप्निल राणे, वेदश्री विवेक पाटील, नजम फरहाज बोहरी, रितिका मनोहर पाटील (गोलकीपर), यशवंती प्रवीण पवार, दर्शना शरद कुंभार ( तामसवाडी), आराध्या प्रसाद पाटील, धनश्री किशोर भोई (तामसवाडी), युगा अनिकेत पाटील, अनन्या जितेंद्र पाटील, अलीना स्वामी फ्रान्सिस( भुसावळ) यांचा समावेश आहे. तर संघ व्यवस्थापक सौ छाया बोरसे व प्रशिक्षक राहील अहमद राहणार आहेत.

फोटो कॅप्शन 

निवड झालेल्या खेळाडू सोबत खुर्चीवर बसलेले राहील अहमद,गुंजा विश्वप्रसाद, फारुक शेख, इम्तियाज शेख, अनिता कोल्हे, हिमाली बोरोले, छाया बोरसे आदी दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button