जळगावसामाजिक

लेवा पाटीदार समाजाचे पहिले ऐतिहासिक युवती व महिला अधिवेशन उत्साहात”

जळगाव – महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे “सकल लेवा पाटीदार युवती व महिला अधिवेशन”जळगाव या ठिकाणी दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी *धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाज कार्य महाविद्यालय,  जळगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले.

या अधिवेशनाला युवती आणि महिलांचा कार्यक्रम असल्याने प्रमुख अतिथी म्हणून जळगावच्या माजी महापौर सौ सीमाताई भोळे, ॲड सौ रोहिणी ताई खडसे खेवलकर, सौंदर्यवती सौ आरती बोरोले, डॉ ताराबाई चौधरी, नागपूर, सौ सुरेखा भागवत भंगाळे, खादी व ग्रामोद्योग विभाग राज्यमंत्री मा. रवींद्र साठे यांच्या स्वीय सहायक सौ ममता यशवंत पाटील, नगरसेविका सौ दीपमाला काळे, नगरसेविका सौ उज्वला बेंडाळे, नगरसेविका सौ गायत्री राणे, अधिवेशनाच्या संयोजिका सौ नीता प्रकाश वराडे, सौ नीलिमा ठोंबरे, प्रा डॉ सौ शिल्पा बेंडाळे, सौ विभावरी इंगळे,सौ विजया जंगले, निंभोरा तालुका रावेर या ठिकाणाहून खास आलेल्या सौ कल्पना सुधाकर पाटील, श्रीमती शोभा दिलीप पाटील, राजोरा ता यावल , सौ पल्लवी भोळे, भोपाळ , सौ कल्पना शिंदे, प्रांजली खर्चे, सौ सारिका पाटील पुणे, सौ विभावरी इंगळे, पुणे, सौ प्रीती इंगळे, जळगाव, सौ मंगलाताई पाटील, भुसावळ, सौ आरतीताई चौधरी, भुसावळ, महासंघाच्या सुरत विभाग संयोजिका श्रीमती वर्षा वाणी,

महासंघाच्या सल्लागार सदस्या डॉ सौ ज्योती महाजन, प्रा डॉ सौ सुनीता चौधरी, विधी सल्लागार सदस्या ॲड सौ भारती ढाके, विधी सल्लागार सदस्या ॲड डॉ सौ ज्योती भोळे, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, सौ उज्वला राणे, सौ निशा पिंपळे, सौ नीता वायकोळे,अकोला, सौ सविता भोळे, सौ ललिता ताई पाटील, सौ चित्रा महाजन, सौ पूजा मानस बोरोले, सौ शुभांगी बोरोले, डॉ सौ भावना चौधरी, सौ नीलिमा राणे , सौ संगीता भोळे, डॉ सौ निलांबरी पाटील सौ पुष्पा पाटील, सौ साधना लोखंडे आदी अनेक मान्यवर युवती व महिला पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याचसोबत स्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील आदरणीय श्री भक्ती प्रसाद महाराज, श्री लक्ष्मी नारायण महाराज, धनाजी नाना विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष माननीय मा आमदार श्री शिरीष मधुकरराव चौधरी, महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण दादा बोरोले, सचिव श्री दिलीप नाफडे, डी एन सी कॉलेज चे सचिव प्रा.डॉ प्रमोद चौधरी, श्री नरेंद्र नारखेडे, फैजपूर, महाराष्ट्र लेवा महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉ श्री प्रमोद हरी महाजन, नाशिक, LCCIA चे संस्थापक प्रथम अध्यक्ष श्री आर डी चौधरी, पुणे, पिंपळे सौदागर मंडळाचे श्री कृष्णाजी खडसे, अध्यक्ष श्री विकास वारके, श्री दिलीप चौधरी, IAS श्री शामसुंदर पाटील, खान्देश सेनेचे श्री सुहास दादा बोंडे, ठाणे, इंदाला संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय महाजन, बढे कॅपिटल्स चे श्री ज्ञानेश्वर बढे, स्पेक्ट्रम इण्डस्ट्रीज चे श्री दीपक चौधरी, मुंबईचे श्री रत्नाकर चौधरी, महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार आणि जळगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मा. श्री पांडुरंग उर्फ बंडू दादा काळे, नगरसेवक श्री सुनील खडके, डी एन सी कॉलेज चे प्राचार्य प्रा डॉ राकेश चौधरी, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री विजय पाटील, डॉ सुधाकर चौधरी, निंभोरा, खानदेश विभाग उपाध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेते श्री चंद्रकांत बेंडाळे, LCCIA चे उपाध्यक्ष श्री किशोर ढाके, LCCIA जळगाव चॅप्टर चे अध्यक्ष श्री नितीन इंगळे, महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संचालक प्रा डॉ एम एन पाटील, अकोला, श्री महेश बोरोले, पुणे , महासंघाचे खानदेश विभाग संयोजक श्री प्रकाश त्र्यंबक वराडे, महासंघाचे खान्देश उपाध्यक्ष श्री महेंद्र पाटील, लेवा शुभमंगल चे संचालक श्री हर्षल जावळे,, महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख श्री नितीन सरोदे, नाशिक, नोबेल टुरिझम नाशिक चे श्री सचिन भोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या मातोश्री स्व गोदावरी आई पाटील, अधिवेशन समन्वयक सौ नीता प्रकाश वराडे यांचे वडील स्व डॉ मुरलीधर कौतिक भंगाळे, महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार मा आ स्व निळकंठ चिंतामण फालक, महासंघाच्या सुरत विभागाच्या संयोजिका श्रीमती वर्षा वाणी यांचे पती स्व. विजय दलपत वाणी तसेच ज्ञात अज्ञात सर्व स्वर्गीय समाज बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर मान्यवर महिला आणि पुरुष यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि आई बहिणाई यांचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खास पुणे या ठिकाणाहून आलेल्या सौ विजया जंगले आणि त्यांच्या सहकारी महिलांनी सुंदर नृत्य करत “गणेश वंदना” सादर करून वातावरणात सात्विकता आणली. यानंतर सर्व पाहुण्यांचे शब्द सुमनांनी त्याच प्रमाणे शाल, सन्मान चिन्ह आणि पिंपळे सौदागर भ्रातृ मंडळ आणि महासंघ यांनी तयार केलेले कॅलेंडर भेट देऊन स्वागत केले. प्रथम महासंघाच्या खानदेश महिला उपाध्यक्षा व महिला अधिवेशनाच्या समन्वयक सौ नीता प्रकाश वराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले..तदनंतर महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण दादा बोरोले यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील यांनी श्री बोरोले यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांचे भाषण वाचून दाखविले आणि महासंघाची भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी उद्दिष्ट सांगताना संदेश दिला की महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि जगभर लेवा पाटीदार व्यक्तींना आणि मंडळांना एकत्रित करून समाज कार्य करणे आहे. कोणत्याही समाजमंडळाच्या अधिकारांना, हक्कांना, कार्यपद्धतीला, कार्यप्रणालीला बाधा न आणता सर्वांचे एकत्रीकरण साधणे आणि समाजोन्नती करणे हेच महासंघाचे ध्येय आहे. तसेच शेतकरी समस्या, ग्रामीण भागातील शैक्षणिक, आर्थिक, व्यसनाधिनतेची समस्या यावर कार्य करून समाजातील अशा समस्यांनी ग्रस्त झालेल्या समाज बांधवांसाठी आपत्कालीन निधी उभारण्याची प्रक्रिया चालू आहे…आणि ती काळाची गरज आहे हे स्पष्ट केले.

आपल्या प्रेरणात्मक संदेशात आदरणीय श्री भक्ती प्रसाद महाराज यांनी सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक मूल्यांवर प्रकाश टाकून अतिशय सुंदर रित्या समजला वर्तमानाचे भान ठेवून जागृत करण्याचा संदेश दिला. आपलं आचरण धर्माला अनुसरून असावं असाही त्यांनी सांगितलं. मुलामुलींनी आपल्यांकुटुंबला अग्रस्थानी ठेवून आपले निर्णय घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. कोणतेही समाजकार्य पैशाशिवाय होत नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाने थोडं थोडं समाजासाठी देत जाणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं.

त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पी एम ओ कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे उपस्थित राहू न शकल्याने या कार्यक्रमासाठी खास पाठवलेला त्यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितांना ऐकवला गेला. त्यात त्यांनी समाजाला एकत्र येण्याची आणि एकमेकाला सहाय्य करण्याची गरज स्पष्ट केली. समाजाच्यासाठी कार्य करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

आदरणीय मा. आ श्री शिरीष दादा यांनी अशा संमेलनाची गरज स्पष्ट करून समाजाला जास्तीत जास्त अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. समाज एकत्रित झाल्याशिवाय समाजबळ वाढणे शक्य नाही असंही ते म्हणाले.

सौ रोहिणीताई खडसे खेवलकर, प्रा. डॉ सौ शिल्पा बेंडाळे, डॉ ताराबाई चौधरी, सौ नीलिमा ठोंबरे, कु प्रांजली खर्चे, अकोला, कु साक्षी खर्चे,अकोला, सौ मेघा जावळे, पुणे, LCCIA चे संस्थापक व महासंघाचे सल्लागार श्री आर डी चौधरी, IAS शामसुंदर पाटील, खानदेश सेनेचे प्रमुख आदरणीय श्री सुहास बोंडे आदी मान्यवरांनी आपला प्रेरणात्मक संदेश देऊन महिलांचे सामाजिक कौटुंबिक विषयांवर आधारित प्रबोधन केले..

महिला अधिवेशन आधारित स्वरचित कविता मुंबईवरून आलेल्या सौ प्रीती लोखंडे यांनी त्यांच्या गोड आवाजात सादर केली.

महाराष्ट्र सौंदर्यवती सौ आरती बोरोले यांना नुकताच मिसेस महाराष्ट्र सौंदर्यवती पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने महिला मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी युवती आणि महिलांसोबत संवाद साधला. आपल्या यशाचे गमक सांगितले आणि युवती व महिलांना प्रोत्साहित केले.

पिंपळे सौदागर भ्रातृ मंडळाचे श्री कृष्णाजी खडसे, अध्यक्ष श्री विकास वारके, श्री दिलीप चौधरी आणि पुणे याठिकाणील टीम यांनी मान्यवरांना विशेष पुणेरी पगडी घालण्याचा समारंभ पार पडला. आदरणीय भक्तिप्रसाद महाराज, मा आ श्री शिरीष दादा चौधरी, श्री अरुण दादा बोरोले सौ रोहिणी ताई खडसे खेवलकर यांना पगडी घातली गेली. त्यामुळे आपण पुण्यात आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला… खूप आनंददायी वातावरण तयार झाले. यानंतर मान्यवर वक्त्यांनी खालील विषयांवर प्रबोधन केले …

१)महिला एकत्रीकरण व यातून सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग

मनोगत: सौ रुपाली अत्तरदे गुजराथ, सौ.नीलिमा नेहेते नाशिक, सौ.पल्लवी भोळे भोपाळ

२)सुजाण पालकत्व

मनोगत : सौ.शोभा नाफडे मलकापूर, सौ.सविता भोळे जळगाव

३)सायबर सुरक्षा

मनोगत: सौ.सारिका पाटील पुणे, सौ.प्रीती इंगळे जळगाव

४)विवाह विषयक समस्या व विवाहानंतर पालकांची भूमिका

मनोगत: डॉ.प्रमोद महाजन नाशिक

५)विवाह विषयक समुपदेशन

मनोगत: डॉ.वीणा चौधरी,मुंबई, सौ.आरती चौधरी भुसावळ

६) महिलांचे कौटुंबिक अधिकार व हक्क

मनोगत: अड. सौ. भारती ढाके,जळगाव, डॉ.अड. ज्योती भोळे जळगाव

७) युवती व महिलांसाठीचे व्यवसायिक मार्गदर्शन

मनोगत: सौ.प्रांजली खर्चे अकोला, सौ.ललिता पाटील,बोरीवली, डॉ.मिलिंद पाटील जळगाव

८) युवती व महिला यांचा उद्योग व्यवसायातील कौशल्य विकास.

मनोगत: श्री.नीलकंठ चौधरी, बोरीवली उद्योजक, श्र.रत्नाकर चौधरी सांताक्रूझ उद्योजक

९)महिलांची आर्थिक साक्षरता

मनोगत: ज्ञानेश्वर बढे.

१०) सकल लेवा संघटन यात महिलांची भूमिका व सहभाग

मनोगत: मंगला पाटील,भुसावळ, गीताताई चौधरी, खिरोदा

११)बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

मनोगत: विभावरी इंगळे, पुणे

१२) लेवा पाटीदार समाज विवाहाची आचार संहिता

मनोगत: कृष्णाजी खडसे, पुणे

१३) महिला व पुरुष शेतकरी कार्यशाळा, माहिती व घोषणा :- श्री.दिलीप नाफडे

यानंतर महासंघ विवाह आचार संहिते प्रमाणे विवाह पार पडलेले आहेत त्यांचा सत्कार सन्मानचिन्ह आणि कॅलेंडर देऊन करण्यात आला. त्यात

सौ.नीता वायकोळे अकोला, डॉ.राजेंद्र मुरलीधर पाटील, पिंपळगाव, प्रा.दिलीप चौधरी, खिरोदा यांचा समावेश होता.

दुपारच्या सत्रात मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील प्रा सौ कविता प्रवीण चौधरी यांनी सरदार पटेल यांच्यावर अतिशय सुंदर समर्पक स्वरचित गीत सादर केले. त्यानंतर विशेष प्राविण्य संपादन केलेल्या युवती आणि महिला यांचा सत्कार आणि सन्मान शाल देऊन करण्यात आला. यानंतर महासंघाचे पद नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले त्यात सौ अनिता सरोदे, छ संभाजी नगर, संयोजिका, डॉ सुदर्शना बढे नाफडे, छ. संभाजी नगर, मराठवाडा विभाग महिला उपाध्यक्ष, सौ कामिनी जावळे,वउल्हासनगर संयोजिका, मुंबई परिसर , सौ स्मिता चौधरी, कल्याण, संयोजिका, विधी सल्लागार सदस्या ॲड सौ भारती ढाके, जळगाव, सल्लागार सदस्या खानदेश विभाग सौ मंगला भीमराव पाटील, भुसावळ, श्रीमती वर्षा वाणी, संयोजिका सुरत, गुजरात महिला उपाध्यक्ष सौ रूपाली अत्तरदे, सुरत, सल्लागार सदस्या सौ छाया पाटील, सुरत, सल्लागार सदस्या सौ प्रतिभा चौधरी, मलकापूर, सल्लागार सदस्या प्रा सौ शोभा नाफडे, मलकापूर यांचा समावेश होता.

लेवा सम्राज्ञी फाउंडेशन तर्फे लेवा पाटीदार कम्युनिटी फेस बुक ऑनलाइन वकृत्व स्पर्धा, स्वलिखित कविता वाचन स्पर्धा यातील जिंकलेले स्पर्धकांचा सन्मान सत्कार ट्रॉफी आणि कॅलेंडर देऊन करण्यात आला…यात 16 ते 25 वयोवगटातून देवश्री सराफ, उत्तेजनार्थ,26 ते 40

वयोवगटातून कीर्ती पाटील (प्रथम,), गायत्री महाजन ( द्वितीय), विशाखा इंगळे(तृतीय), तर प्रियांका सरोदे आणि हेमलता इंगळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

वयोवगट 41 वर्षावरील स्पर्धकांमध्ये सीमा चौधरी ( प्रथम), किर्ती लोखंडे (द्वितीय), माधुरी नेहेते (तृतीय) तर सुवर्णा नारखेडे, अर्चना भोगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

भुसावळचा चिमुकला चि तीर्थराज मंगेश पाटील याने स्केटिंग स्पर्धेत तीन देशात जाऊन प्राविण्य मिळवल्याबद्दल त्याचा ट्रॉफी कॅलेंडर देऊन सन्मान करण्यात आला.

अधिवेशनाचा केंद्रबिंदू ठरलेला मुद्दा म्हणजे कार्यक्रमात मोठ्या संखेने पैठण्यांचे वाटप….

ठाणे येथील खान्देश सेनेचे अध्यक्ष श्री सुहास दादा बोंडे यांनी खान्देश सेनेतर्फे 18 पैठणी तर लोकमत सखीमंच तर्फे दोन पैठणीचे सौजन्य सौ कामिनी जावळे यांच्याकडून दिल्या …यांचा लकी ड्रॉ आयोजित केला होता. त्यांचे सहकारी आणि महासंघाचे संयोजक श्री नितीन जवळे आणि महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील यांनी ड्रॉ काढून वितरणाची जबाबदारी पार पाडली.

डॉ मिलिंद पाटील यांच्या संकल्पनेतून ” पैठणी माझीच…” ही थीम राबवण्यात आली, त्यांनी स्वतः निवेदकाची भूमिका पार पाडत प्रत्येक ड्रॉ काढतांना सभागृहातील महिलांना हसत खेळत, त्यांच्या पर्यंत पोहचत पैठणी साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला…आणि वातावरण पैठणीमय करून टाकले. यामुळे दिवसभर पैठणीच्या प्रतीक्षेत युवती आणि महिलांनी खूप एंजॉय केलं.

लेवा गणबोली भाषेत लिहिणाऱ्या प्रख्यात कवयित्री सौ शीतल पाटील यांनी ” व माही सरला…” ही लेवा गणबोली भाषेतील त्यांची स्वरचित कविता अतिशय बहारदार पद्धतीने सादर करून सर्व माता भगिनी महिलांची मने जिंकली.

डॉ मिलिंद पाटील यांनी लेवा गणबोलीत नाट्यमय संवाद साधत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. लेवा गणबोलीचं संवर्धन करणाऱ्या मुंबई, पुणे तसेच विदेशापर्यंत मोठ्या पदावर असून आजही घरात लेवा गणबोली बोलणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. भाषांच्या प्रवाहात लेवा गणबोली तरली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात प्रदर्शिनी चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी १८ स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याठिकाणी खाण्याच्या पदार्थापासून, कपडे, पुस्तके,सेवा क्षेत्रातील संधी अशा वैविध्यपूर्ण बाबींचा समावेश होता.

दुपारी खास खानदेशी राखेतील बट्टी अर्थात रोडगे, वरण आणि वांग्याची भाजी, आमसूल कढी,भात असा बेत होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बॉटल्ड पाण्याने केली होती.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक कार्यकर्ते समाज बांधव यांनी मदत केली…त्यात विदर्भ लेवा भ्रातृ मंडळ जळगाव चे श्री संजय पाटील आणि सुनील बढे, महासंघाचे संयोजक श्री प्रकाश त्र्यंबक वराडे, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे संचालक श्री प्रवीण खडके, श्री कोळंबे सर, उमाकांत भादले, श्री उमाकांत बोंडे, श्री सुनिल काळे,, श्री उल्हास पाटील वरणगाव, श्री नितीन तळेले ,उद्योजक भास्कर बोरोले, श्री प्रदीप पाटील, राजोरे , श्री किशोर खडसे, श्री अरुण सराफ, श्री उमाकांत जावळे, श्री अनिल भोळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. सन्माननीय दात्यांच्या उत्स्फूर्त दातृत्वभावनेने अधिवेशन यशस्वी होण्यास मोलाची मदत झाली. कार्यक्रमासाठी रांगोळीने रूपाली फालक ताई यांनी शोभा आणली.

या भव्य कार्यक्रमाचे समग्र आभार प्रदर्शन महासंघाच्या सल्लागार सदस्या डॉ सौ ज्योती महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन महासंघाच्या सल्लागार सदस्या प्रा डॉ सौ सुनीता चौधरी आणि महासंघाच्या विधी सल्लागार सदस्या ॲड डॉ सौ ज्योती भोळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button