

जळगांव – क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीच्या औचित्याने 3 जानेवारी रोजी डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव मराठी विभाग व माजी विद्यार्थिनी समिती आयोजित कार्यक्रमात खुबचंद सागरमल विद्यालयाच्या शिक्षिका सुनिता नारखडे -येवले लिखित ‘ स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला’ व ‘शब्दराई’ या दोन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा धांडे सभागृह डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविदयालय येथे प्रा व पु होले ( सुप्रसिद्ध कथाकार व साहित्यिक) यांच्या हस्ते पार पडला. आपल्या “स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला” या काव्यसंग्रहात कवयित्रींनी महाष्ट्रातील संत परिवारातील, ऐतिहासिक काळातील, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाजपरिवर्तन क्षेत्रात क्रियाशील असणाऱ्या तसेच साहित्य, कला, संस्कृतीच्या क्षेत्रात छाट उमटविणाऱ्या प्रतिभासंपन्न महनायिकांची यशोगाभा मांडली आहे. यासाठी त्यांनी ‘ओवी’ हा छंदप्रकार निवडलेला असला; तरी त्यांनी या छंदप्रकाराचा एक आगळावेगळा आकृतीबंध मराठी कवितेला दिला आहे. तर शब्दराई यात विविध विषयांवरील कविता सोप्या सुलभ भाषेत उत्कृष्ठरित्या शब्दबद्ध केलेल्या आहेत.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. गौरी राणे, सेवानिवृत्त शिक्षक पी झेड नारखेडे, ज्येष्ठ साहित्यिक ए के नारखेडे, प्रा डॉ सत्यजीत साळवे, प्रा संध्या महाजन, संगीता माळी व अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, विनोदजी बियाणी, मुख्याध्यापीका योगीनी बेंडाळे, प्रदिप भोळे , निखिल जोगी हे विचारमंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक व कविता वाचन करुणा महाले यांनी तर ओवी व गीते गायन प्रा ऐश्वर्या परदेशी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी केले या प्रसंगी प्रा संध्या महाजन, प्रा डॉ सत्यजीत साळवे, प्राचार्या डॉ गौरी राणे, जेष्ठ साहित्यिक श्री ए के नारखेडे, श्रध्दा चौधरी, व कवयत्री व लेखिका सुनिता नारखेडे – येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सहकार्य करणारे श्री अजय पाटील व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला प्रा डॉ अनिता कोल्हे ,सायकलपटु कामिनी धांडे ,उडान फाऊंडेशनच्या हर्षाली चौधरी, स्मामिनी फाऊंडशनच्या अध्यक्ष ॲड भारती ढाके, भाग्यश्री पाटील, मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांचा ही सत्कार करण्यात आला .
व. पु. होले यांनी आपल्या मनोगतात सांगीतले कि साहित्य मार्गदर्शक , प्रेरणादायी ,आंनददायी असले पाहिजे व ते ‘शब्दराई ‘या संग्रहात दिसते तर स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला या संग्रहात हाताळलेला ओवी प्रकाराचे कौतुक केले. वाचन संस्कृती,संस्कार जपणूकीसाठी पुस्तके विकत घेवून वाचण्याचे , इतरांनाही देण्याचे व चर्चा करण्याचे आवाहन ही केले . प्री वेडिंग सारख्या प्रथा सर्वानी बंद करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खुबचंद सागरमल विद्यालय, बहिणाई बिग्रेड, अखिल भारतीय लेवा पाटील युवक महासंघ यांचे सहकार्य लाभले.



