राज्यक्राईम

वादग्रस्त शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक – नाशिक जिल्हा परिषदेत सध्या प्राथमिक शिक्षणाधिकारी व तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत असलेले नितीन पोपट बच्छाव यांच्यासह सबंधित संस्थेचे अध्यक्षवि जय पंडित पाटील (रा. अथर्व बंगला, सटाणा) यांच्यावर सटाणा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. शिक्षक भरतीची परवानगी नसतांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षणसेवकांची भरती करून फसवणूक करून सन 2012 ते 2018 या कालावधीत बनावट भरती प्रक्रिया राबविण्यात आल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये 9 डिसेंबर 2024 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दिनेश शिवाजीराव सोनवणे (रा. ताहाराबाद रोड, सटाणा) यांनी सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बागलाण येथील नाशिक जिल्हा विधायक कार्यकारी समितीने शिक्षक भरतीची परवानगी मिळविण्यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी शिक्षणाधिकारी नाशिक यांचेकडे अर्ज केलेला होता. पण सदर भरती साठी शासनाची व शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी मिळालेली नसतांना देखील 16 फेब्रुवारी 2012 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. नितीन बच्छाव व विजय पाटील यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती प्रक्रिया राबवली. भरतीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून तारखांमध्ये देखील फेरफार करण्यात आला आहे. शिक्षण सेवकांना बेकायदेशीर रित्या भरती करत शासनाची फसवणूक केली. तसेच शिक्षण संस्थेचे चिटणीस सुखदेव सोनवणे यांनी सदर भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला होता. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील ही भरती नियमबाह्य असल्याचा दाखला दिलेला होता. तरीदेखील कायदेशीररित्या भरती करण्यात आली नाही. माहिती अधिकारात शिक्षणाधिकाऱ्यांची टिपणी मागविण्यात आली त्यानुसार सन 2018 मध्ये शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी 47 शिक्षण सेवकांना मान्यता दिल्याचे टिपणीत नमूद असून यामध्ये बिंदू नामावली तपासणी बाबत देखील अनेक त्रुटी आहेत. असे फिर्यादीत नमूद केलेले आहे.

नितीन बच्छाव जळगाव जिल्हा परिषदेत देखील शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतांना अशा रितीने काही बेकायदेशीर कृत्य केलेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी माहिती अधिकारात याविषयीची माहिती मागितलेली आहे. परंतु जन माहिती अधिकाऱ्यांनी माहिती न  दिल्यामुळे, कोल्हे त्यांनी  माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या कडे प्रथम अपील अर्ज केलेला असून सदर अर्जाची सुनावणी होऊन अमोल कोल्हे यांना सदर माहिती 15 दिवसात देण्यात द्यावी. असे आदेश शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी संबंधित जन माहिती अधिकारी यांना देण्यात आलेले असून देखील आजपर्यंत त्यांना माहिती मिळालेली नाही. त्यामुळे बच्छाव जळगाव येथे कार्यरत असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय वाढतो आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button