जळगावशैक्षणिक

वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” मासिक प्रकाशन सोहळा उत्साहात

जळगाव – येथील श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पी. ई. तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” या वार्षिक मासिकाच्या प्रकाशनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव आप्पासाहेब देवकर, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुप्रीम इंडस्ट्रीज गाडेगावचे उपाध्यक्ष मा. श्री. सुरेशजी मंत्री, डॉ. सुरेश पाटील, किड्स गुरुकुलचे चेअरमन मा. आदेश ललवाणी, रेडक्रॉस जळगावचे मा. सुभाषजी साखला, नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. श्री. अजित वाघ सर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, उपाध्यक्ष सौ. निर्मलाताई पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर व मा. श्री. भूषण पाटील सर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधांशु सिंग, फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मनीषा टोनपे, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. समिक्षा वारके व नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मनीषा बडगुजर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गीत-गायन, कविता वाचन तसेच वाद्यवृंद सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी मा. श्री. राजू मामा भोळे, मा. श्री. गुलाबराव देवकर, मा. आदेश ललवाणी, मा. सुरेशजी मंत्री व वाघ सर यांनी आपल्या मनोगतातून तात्या साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. पी. ई. तात्या पाटील यांनी विद्यार्थ्यांसह सर्व डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button