

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर चौकात आयोजित कीर्तन कार्यक्रमात चौथ्या दिवशी ह .भ.प प्रल्हाद महाराज कळमसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरवपूर्ण कीर्तनातून उल्लेख केला.
महाराज म्हणाले की, “शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षणकर्ते होते. त्यांनी न्याय, शौर्य आणि लोककल्याण यांचा आदर्श ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.”
कीर्तनादरम्यान महाराजांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग — जसे माता जिजाबाईंचे संस्कार — भावपूर्ण शैलीत सादर केले. उपस्थित भाविकांना राष्ट्रभक्तीचा आणि अभिमानाचा भाव अनुभवास आला.
कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक मेहरुण यांच्या वतीने करण्यात आले होते.मेहरुण परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.दैनिक हरिनाम किर्तन सहभाग गायक ह.भ.प. राजु महाराज, बोरगांव, ह.भ.प. लखन महाराज, धोनखेडा
मृदुंगांचार्य : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, राजु पेटी वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, अंभई विणेकरी : श्री. भास्कर महाजन, श्री. अशोक देवरे, मेहरूण टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.




