जळगावशैक्षणिक

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जळगाव – श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे संचालक अरुण चाटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त  श्री. अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक राहुल लष्करे, रामचंद्र वंजारी,  भानुदास नाईक, विजय वाघ, भगवान लाडवंजारी,  संतोष चाटे, संचालिका संध्याताई नाईक, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी, बबलू तडवी, लता लाडवंजारी, अमिन शेख, अक्रम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक संगीत कवायत सादर केली. या कवायतीचे नियोजन क्रीडा शिक्षिका सरस्वती पाटील यांनी केले. तसेच विद्यालयातील मुलींचे आर.एस.पी. पथक प्रजासत्ताक दिन परेडसाठी पोलीस मैदान, जळगाव येथे रवाना झाले. या पथकाचे नियोजन आर.एस.पी. पथक प्रमुख प्रतिभा पाटील व दिनेश पाटील सर यांनी केले.

इयत्ता १ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे, देशभक्तीपर नृत्य व गीत सादर केली. दीपाली घुगे, प्रेरणा शिंदे, राधिका दुर्वा व ईरफान तडवी या विद्यार्थ्यांनी भाषण व गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, चंद्रशेखर आजाद आदींच्या विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी सना पिंजारी यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शासनाची टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सना पिंजारी, राजश्री तायडे  व सविता सूर्यवंशी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी अक्रम शेख व नितीन पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी व उप सांस्कृतिक प्रमुख सरस्वती पाटील  यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयातील शिक्षक गणेश आंधळे यांनी केले, तर आभार सविता सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button