

जळगाव – श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयात महापरीनिर्वाणदिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग, प्रा. डॉ.संदीप गुरचर, प्रा. डॉ. समिना खान, आरोग्य अधिकारी डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ.स्वाती सोनवणे,डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. जयेश वाल्हे ई. मान्यवरांनी पुष्पहार व फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग यांनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली, डॉ. स्वाती सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या कल्यणासाठी केलेल्या कार्याविषयी विश्लेषण केले, सौ.फाल्गुनी सोनवणे यांनी पण आपल्यां भावना व्यक्त केल्या. समारोपिय भाषणामध्ये डॉ. जयेश वाल्हे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऊर्जामंत्री असतांना भाकरा-नांगल येथील भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प सारख्या दूरदृष्टीने सुरू केलेल्या कामाबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले, तसेच यां महामानवाला खरी मानवंदना द्यायची असेल तर भारतीय संविधानातील सर्व नियमाचे आदराने पालन करून भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्व कर्तव्य पार पाडावी तसेच चांगले नागरिक बनण्यासाठी सर्वप्रथम चांगला माणूस बनणे गरजेचे आहे.असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थिनी श्रद्धा राऊत ने केले.
यावेळी नवलं परदेशी , आकाश सोनवणे, इरफान शेख, कुंदन तिवारी व इतर कर्मचारी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी उपस्थित होते. श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम घेण्यात आला.




