ताज्या बातम्या
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला उद्योजक शरद नाईक यांच्या कडून शालेयपयोगी वस्तू भेट


जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी माझा सहभाग मराठी शाळा वाचवण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. परिसरातील सर्व नागरिकांना लोकसहभागातून शाळा चालवण्याच्या आव्हान केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद मिळत असून शाळेची अनेक हितचिंतक पुढे येऊन मदत करत आहेत. कोणी मुलांसाठी खेळ साहित्य, तर कोणी आर्थिक मदत करत आहे. आज मराठी शाळेची विद्यार्थ्यांसाठी दमछाक असताना श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे . त्यासाठी गोर गरिबांच्या मुलांच्या मदतीसाठी शिवम प्लास्टिक चे उद्योजक शरद नाईक यांच्याकडून आज शाळेला दहा ग्रीन चटई देण्यात आल्या.शाळेच्या व्यवस्थापन समिती कडून मुकेश नाईक यांनी उद्योजक शरद नाईक यांचे आभार मानले.



