

जळगाव: विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे येईल आणि विद्यार्थ्यांना शाळा हे दुसरे घर कसे वाटेल, यासाठी शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यासाठी १०० टक्के हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वस्तू व वृक्ष देऊन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले की, या उपक्रमामुळे शाळा काही वेगळी भानगड नाही तर श्वासा इतकीच आपल्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे आणि त्यामुळे शाळेकडे पाठ फिरवणारी मुले शाळेवर आणि शिक्षणावर प्रेम करायला लागावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. सूत्रसंचालन सोनाली चौधरी यांनी केले. यावेळी शिक्षक वृदांसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थी व उपस्थित होते.



