

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक होते, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये इयत्ता 9 वीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी साक्षरता अभियान नृत्य , संविधानावर पथनाट्य सादर केले. विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सदस्य एकनाथ वाघ ,भागवत सानप,रमेश चाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन शितल कोळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले. स्त्रीभ्रूण हत्येवर शिक्षिका रुपाली आव्हाड मॅडम यांनी गीत गायले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




