

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय नेहमी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अग्रेसर असते.
थंडीत डोक्यावर मोरपिसांची टोपी, लांबडा शर्ट, धोतर, कमरेला उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, अशी वाद्ये आणि काखेत झोळी अशा वेशात आलेले वासुदेव शाळेत आले. मुले देखील त्याला पाहून आनंदली. श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आपली मराठी संस्कृती वासुदेव लोककला देखील मुलांना शिकविली. हल्ली प्रत्येकाची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असतात. परिणामी पाश्चिमात्य गोष्टी शिकविणारे अनेक उपक्रम शाळेत घेतले जातात. मग अगदी काल परवा नाताळ साजरा करताना सांताक्लॉज देखील प्रत्येक शाळेत अवतरले जातील. परंतु आम्ही वासुदेव अवतरले शाळेत मुलांना वासुदेवाच्या वेषात बोलवून मुलानं समोर वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणण्यास सांगितले. आपली संस्कृती लोककला देखील मुलांना समजली पाहिजे असा त्या मागील हेतू होता असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




