जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये ‘आपलं विद्यालय- आपला स्वाभिमान’ उपक्रमा अंतर्गत सेवा सन्मान पुरस्कार 2025

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये १ सप्टेंबर रोजी शाळांमध्ये ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ या संकल्प दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी विविध संकल्प घेतले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यासारख्या उच्च मूल्यांची जाणीव झाली. शाळेतील उपशिक्षिका शितल कोळी यांना तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते सेवा सन्मान 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच अशा शासनाच्या उपक्रमामुळे विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील, असे कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, कविता वंजारी ,साधना शिरसाट, सरला पाटील, शारदा तडवी, सुवर्णा पाटील, दिनेश पाटील सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button