जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘हिंद-दी-चादर’ उपक्रमांतर्गत व ‘एकतेत शक्ती’ वर समूह चर्चा 

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त “हिंद-दी-चादर” कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यागमय जीवनकार्याची व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देण्यात आली.

भक्तीगीतावर आधारित समूहगान सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातून देशभक्ती, मानवता व बंधुतेचा संदेश देण्यात आला.

तसेच “ *एकतेत शक्ती”* या विषयावर समूह चर्चा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकजुटीचे महत्त्व, सहकार्याची गरज आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद यावर आपले विचार मांडले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश नाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत एकता, शिस्त व संघभावना या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button