जळगावशैक्षणिक

सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगावचा समुपदेशन व समावेशक शिक्षणासाठी कर्णबधिर विद्यालयात शैक्षणिक अभ्यासदौरा

जळगाव, दि. १८ जुलै २०२५ – सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे बी.एड. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025–2026 शैक्षणिक वर्षात PE-5 (मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण) या विषयांतर्गत प्रात्यक्षिक कार्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कर्णबधिर विकास विद्यालय, सावखेडा येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अभ्यास भेटी दरम्यान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती खानोरे यांनी विद्यार्थ्यांना विशेष विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या व त्या सोडवण्यासाठी केले जाणारे उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच नीलम तरवटे यांनी शाळेची स्थापना, प्रवेश प्रक्रिया आणि अध्यापनाची विशेष पद्धती याविषयी माहिती दिली.

विद्यार्थी-शिक्षकांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि समावेशक शिक्षण प्रक्रियेचे निरीक्षण केले. या क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समुपदेशन व समावेशक शिक्षणाच्या संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत झाली.

या यशस्वी अभ्यासदौऱ्याचे आयोजन व मार्गदर्शन डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, श्री. पंकज वाघ आणि बी.एड. द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी-शिक्षक यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button