जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे दिनांक 8 मार्च 2025 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या  डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सरस्वती देवी, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कवयित्री बहिणाबाई चौधरी व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना  अभिवादन करण्यात आले.

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी आर्थिक साक्षर व्हावे, तसेच सर्वार्थाने सक्षम व्हावे. जेणेकरून समाजामध्ये महिलांसोबत ज्या अप्रिय घटना घडत आहेत त्यांना महिला बळी पडणार नाहीत आणि  या सर्व घटनांना त्या योग्य रीतीने तोंड देऊ शकतील”. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक महिला दिवस साजरा करण्याविषयीची पार्श्वभूमी सांगितली. पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,  “8 मार्च रोजी महिलांच्या सुरक्षेसाठी व हक्कांसाठी पहिला लढा अमेरीकेतील न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योग कारखान्यातील स्त्रियांनी केला होता म्हणून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो”.

त्यानंतर स्वागत समारंभ आणि दितीय वर्ष विद्यार्थी शिक्षिका अर्चना येवले यांनी इतिहासातील कर्तबगार स्त्रियांविषयी वर्णनात्मक माहिती दिली. डॉ प्रतिभा पाटील यांनी परिवाराला आधार देऊन व पारिवारिक जबाबदारी सांभाळून स्त्रिया कशाप्रकारे संघर्षातून पुढे येतात याविषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले.  ‘सरिता ‘ म्हणजे नदी आणि नदीची उपमा देऊन उपनद्या कशा कार्य करतात हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करून ग्रंथपाल पंकज वाघ यांनी स्त्री ची महती सांगितली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षिका चंद्रलेखा पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  प्रा.डॉ. नारायण खडके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, ग्रंथपाल पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांच्यासह  प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक यांचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button