जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिन उत्साहात साजरा

जळगाव (दि. 15 सप्टेंबर 2025) : सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रतिभा पाटील यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली तसेच राष्ट्रभाषा हिंदीच्या महत्त्वावर भाष्य केले. त्यांनी राष्ट्रीय एकता दृढ करण्यासाठी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रभारी प्राचार्य डॉ. वानखेडे यांनी आपल्या भाषणात प्रत्येक शाळा व महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच हिंदीच्या प्रसारासाठी राष्ट्रीय स्तरावर संगोष्ठी आयोजित करण्याची सूचना दिली. नेट परीक्षेसाठी हिंदी भाषेचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थी अक्षय जाधव, माधुरी ठाकरे, जया तलरेजा आणि दिपाली पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन पंकज वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय जाधव यांनी केले.

या उपक्रमासाठी डॉ. नारायण खडके यांनी विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांचे योगदान लाभले. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनीही या वेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button