

जळगाव – सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी बी.एड. प्रथम वर्ष (शैक्षणिक वर्ष 2025-26) विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी Student Orientation Program उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थी उद्बोधन व अभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन डॉ. अनिता वानखेडे यांनी केले. बी.एड. अभ्यासक्रमातील महत्त्वाचा घटक असलेल्या मायक्रो टीचिंगविषयी तपशीलवार माहिती डॉ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तसेच कार्यक्रम घेण्यामागील उद्देश, प्रक्रिया, तसेच आंतरर्गत परीक्षांविषयी माहिती प्रा. सुवर्णा अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. अभ्यासेत्तर उपक्रम व महाविद्यालयातील विविध सुविधांची माहिती डॉ. जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालनादरम्यान विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमात द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आपल्या मिळालेल्या शैक्षणिक अनुभवांची वाटणी केली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. नारायण खडके यांनी आवश्यक परवानगी व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.




