

जळगाव, 1 ऑगस्ट 2025 – सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी प्रियांका पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या कार्यक्रमामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडून दाखवली. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी भावना हिने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल पंकज वाघ यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक कार्यावर माहितीपूर्ण विवेचन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. नारायण खडके यांनी मार्गदर्शन व परवानगी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांचे विशेष योगदान लाभले. या प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक समता व प्रेरणादायी विचारांची बीजे रुजवली.




