ताज्या बातम्या

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन

जळगाव – सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान माउंट व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना मुलाखतीचा अनुभव येण्यासाठी तसेच मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे कळावे हाच सदर कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू होता असे आयोजकांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे आहे, त्या सर्वांनी महाविद्यालयात उपस्थित राहून इंटरव्यू दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माउंट व्हॅली स्कूलचे विजय हडप उपस्थित होते. सदर मुलाखतीसाठी एकूण 21 विद्यार्थी शिक्षकांनी मुलाखत दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.जयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमसाठी डॉ.नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ.प्रतिभा पाटील, डॉ.जयश्री पाटील, प्रा सुवर्णा अहिरे, प्रा निधी शर्मा, प्रा जयश्री शिंगाडे तसेच अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button