

जळगाव – सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. वर्षा खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचे विचार मांडले.
प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी आपल्या उद्बोधनात विद्यार्थ्यांना केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता स्वावलंबी पर्यायांकडे वळण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, ग्रंथपाल पंकज वाघ यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला द्वितीय वर्ष शिक्षक विद्यार्थी, सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




