ताज्या बातम्या

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संस्थेचे संचालक सदस्य श्री. पांडुरंग आप्पा खडके हे होते. त्यांनी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या. त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी आपले संविधानिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुनिता पाटील यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता अभियान राबवले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. नारायण खडके यांनी विशेष मार्गदर्शन केले.या प्रसंगी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा तसेच शिक्षकेतर कर्मचारी व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button